शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

Lok Sabha Election 2019 मच्छीमारांचे राजकीय पक्षांचे राजीनामे - हर्णैतील बैठकीत निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:35 PM

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारंपरिक मच्छीमार विरुद्ध तांत्रिक मच्छीमार संघर्ष विकोपाला गेला असून, पारंपरिक मच्छीमार बांधवानी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे- पारंपरिक मच्छीमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

दापोली :  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारंपरिक मच्छीमार विरुद्ध तांत्रिक मच्छीमार संघर्ष विकोपाला गेला असून, पारंपरिक मच्छीमार बांधवानी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही, असा एकमुखी निर्णय घेत सर्वच राजकीय पक्षांचे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे यावेळी राजीनामेही देण्यात आले. पारंपरिक मच्छीमार बांधवानी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय पक्षाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

हर्णै बंदरात शुक्रवारी दापोली, मंडणगड, गुहागर पारंपरिक मच्छीमार समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार व राजकीय पक्षांचे सामुदायिक राजीनामे देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कोकण समुद्रकिनाऱ्यावरील तांत्रिक मच्छीमार विरुद्ध पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष पेटला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आक्रमक झाल्याचे  पाहायला मिळत आहे. या मच्छीमारांची बैठक हर्णै येथे पार पडली. यापूर्वीच्या बैठकीत एलईडीद्वारे होणारी मासेमारी येत्या १५ दिवसात थांबली नाही, तर सरकारचा निषेध म्हणून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मच्छीमार संघर्ष समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. 

पारंपरिक मच्छीमार बांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु, मच्छीमार संघटनांमध्ये मतैक्य होऊ शकले नाही. अखेर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला. ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना काढून पर्ससीन मासेमारी केली जात आहे, त्या सर्व नौकांवर धडक कारवाई करावी तसेच नौकामालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्या नौकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द व्हावेत आणि अशा नौका आत्तापर्यंत ज्या मच्छीमारी संस्थांकडून डिझेल उचल करीत होत्या आणि आहेत, त्या संस्थांचा परवाना रद्द करावा तसेच शासनाने त्यांचा डिझेल कोटा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

रत्नागिरीमधील पर्ससीन मच्छीमार आमचा डिझेल कोटा रद्द झाला तरी चालेल. आम्हाला गरज नाही, असे सांगतात. त्यामुळे या नौकामालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यांना आत्तापर्यंत डिझेल पुरवठा करणाऱ्या संस्थांचा डिझेल परवाना आणि शासनाचा डिझेल कोटा कायमस्वरूपी रद्द करावा त्याशिवाय संस्था नोंदणी रद्द करावेत, अशा पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्या आहेत. या बैठकीला मच्छीमार नेते यशवंत खोपटकर, महेंद्र चौगुले, अस्लम अकबानी, पांडू पावसे तसेच मच्छीमार उपस्थित होते.

टॅग्स :ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गPoliticsराजकारणkonkanकोकण