शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेत १६ जागा ओबीसींना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:13 IST

जिल्हा परिषदेच्या एकूण ६२ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या एकूण ६२ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ३१ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्केप्रमाणे १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तेजस्विनी पाटील आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पूजा पाष्टे या मुलीने काढल्या. निवडणूक निर्णय विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यातील ८ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे.या आरक्षणानुसार केळशी, अलोरे, वाटद, दाभोळ, ताम्हाणे, शुंगारतळी, पालगड, उसगाव, पडवे, कोतवडे, पावस, साडवली, विरांचीवाडी, लोटे, धामणदेवी, वेळणेश्वर, नाचणे, धामापूर तर्फ संगमेश्वर, कोसुंब, तळवडे हे गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारणमध्ये जालगाव, दयाळ, शिरळ, पेढे, शिरगांव, सावर्डे, खेर्डी, उमरोली, वहाळ, निवळी, कोकरे, असगोली, कुवारबाव, गोळप, कनकाडी, दाभोळे, भांबेड, साठवली, केळवली, कशेळी, जुवाठी या गटांचा समावेश झाला आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी इस्लामपूर, बाणकोट, भरणे, कसबा, करबुडे, झाडगाव, कोंडकारूळ, कातळी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी भिंगळोली, कडवई, खालगाव, हातखंबा, खेडशी, साखरीनाटे, धामपूरतर्फ संगमेश्वर, माभळे, टेटवली हे गट आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सुकिवली तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आसगे, अनुसूचित जातीसाठी भडगाव, गव्हाणेचा समावेश आहे.

आक्षेप धरले ग्राह्यआरक्षण प्रक्रियेनंतर कोकरे गटाचे आरक्षण गतवेळी सर्वसाधारण महिला असतानाही यावेळी पुन्हा महिला काढण्यात आल्याचा आक्षेप संतोष चव्हाण यांनी घेतला होता. उमरोली गटाबाबतही तीच सूचना करण्यात आली. दोन्ही सूचनांची उलट तपासणी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी तत्काळ केली. त्यात दोन्ही आक्षेप ग्राह्य असल्याचे निदर्शनास आले. आरक्षणाविषयीच्या हरकती पुढील तीन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत.असे आहे आरक्षणसर्वसाधारण महिला- २०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण- ८, अनुसूचित जाती महिला- २, अनुसूचित जाती सर्वसाधारण- १, अनुसूचित जमाती महिला- १. याखेरीज २२ गट सर्वसाधारण म्हणून खुले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीZP Electionजिल्हा परिषदreservationआरक्षण