क्षेत्रीय वैदिक संमेलने प्रत्येक जिल्ह्यात व्हावीत : पालकमंत्री उदय सामंत
By मेहरून नाकाडे | Updated: February 8, 2025 17:58 IST2025-02-08T17:57:53+5:302025-02-08T17:58:35+5:30
रत्नागिरी : हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन असून संस्कती आणि परंपरा या संमेलनामधून सर्वदूर पसरली जाईल, ...

क्षेत्रीय वैदिक संमेलने प्रत्येक जिल्ह्यात व्हावीत : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन असून संस्कती आणि परंपरा या संमेलनामधून सर्वदूर पसरली जाईल, तेव्हा या केंद्राची ताकद भविष्यात देशाला कळेल. क्षेत्रीय वैदिक संमेलन पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर खुल्या मैदानात आयोजित करावे. त्याची जबाबदारी माझ्यावर द्यावी. आपली संस्कृती, आपली परंपरा दाखवून देण्यासाठी, पुढे घेवून जाण्यासाठी आणि जपण्यासाठी अशी संमेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. उदय सामंत यांनी केले.
कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून (दि.७) क्षेत्रीय वैदिक संमेलन रत्नागिरीत सुरु आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री शनिवारी (दि.८) डॉ. सामंत यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना हे उपकेंद्र रत्नागिरीत सुरु करण्यात आले. अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. परंतु आज मला याचे समाधान आहे. या उपकेंद्रात वेद पठन करणारे, संस्कृतचे शिक्षण घेणारे भविष्यात लाखोंना प्रशिक्षण देतील, त्यावेळी या केंद्राची ताकद देशाला कळेल. शासनाच्या माध्यमातून योगा शिकविणारे राज्यातील एकमेव हे केंद्र असल्याचे पालकमंत्री डाॕ सामंत यांनी सांगितले.