शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मागासवर्गीयांवर शिक्षक भरतीत अन्याय - ५० टक्के कपात - मुंबईत डी. एड्, बी एड्.धारकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:11 IST

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्यात आल्याने मागासवर्गीय समाजात मोठा रोष निर्माण झाला होता,

रत्नागिरी : शिक्षक भरतीत सर्व प्रवर्गांच्या रिक्त पदांची समान भरती करण्याची आवश्यकता असतानाही केवळ मागासवर्गीय रिक्त जागांची ५० टक्के कपात करून तत्कालिन सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. सध्याच्या सरकारने हा अन्याय दूर करून मागासवर्गीय प्रवर्गाची उर्वरित ५० टक्के पदे याच अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरावीत, या मागणीसाठी राज्यातील बेरोजगार शिक्षकांनी ११ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यात कोकणासह राज्यभरातील डी. एड्, बी. एड्.धारक सहभागी झाले आहेत.भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्यात आल्याने मागासवर्गीय समाजात मोठा रोष निर्माण झाला होता, जो अद्यापही शमलेला नाही. त्यामुळे आझाद मैदानावर राज्यातील उमेदवारांनी या अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. राहुल खरात, रमेश गाडरे, शीतल लांडगे, कृपाली शिंदे, अमोल गायकवाड, भाग्यश्री रेवडेकर, चेतन पाटील हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.यावेळी आंदोलकांनी सरकारला दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्यात सन २०१०नंतर शिक्षक भरतीवर बंदी आणण्यात आली. त्यामुळे गेली ९ वर्ष शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी युती सरकारमधील तत्कालिन शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी ‘पवित्र पोर्टल’मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. त्या अनुषंगाने डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी (टीएआयटी) घेण्यात आली.दिनांक ९ आॅगस्ट २०१९ रोजी शिक्षक भरतीची पहिली निवड यादी जाहीर झाली. पण शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांच्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पत्रान्वये खुल्या प्रवर्गाला जागा नाहीत अशा जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचा ५० टक्के अनुशेष ठेवण्यात आला. ज्या जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा उपलब्ध आहेत, तेथील १०० टक्के पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या अन्यायकारी निर्णयामुळे १७ जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांच्या  चार हजारांपेक्षा अधिक पदांची कपात करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी-कामगारांच्या शिक्षक होऊ इच्छिणाºयांवर अन्याय झाला. २४ हजार शिक्षकांची भरती करू म्हणणाऱ्या तत्कालिन सरकारने केवळ १२ हजार जागांची जाहिरात काढून त्यातही जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेत  भरतीतही अन्याय केल्याचे या आंदोलकांनी म्हटले आहे.५० टक्के कपात रद्द करण्याची मागणीमहाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (सरकारी शाळा - जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद) शाळांमध्ये २४ हजारहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांची ५० टक्के पद कपात करण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. मागासवर्गीय उमेदवारांना न्याय मिळावा, ५० टक्के कपात रद्द होऊन या भरतीसाठी पदे उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

मागील २ वर्षांपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याने आम्ही हे आजपर्यंतचे तिसरे उपोषण करत आहोत. न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. आमचे काही बरे-वाईट झाले तर ग्रामविकास आणि शिक्षण विभाग जबाबदार असेल.- राहुल खरात, (उपोषणकर्ता)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप