शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी लढतीतच कळणार खरी ताकद

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

युती फुटली, आघाडीत बिघाडी : मुख्य लढत शिवसेना-राष्ट्रवादीत होण्याची शक्यता

रत्नागिरी : महायुतीत झालेली फाटाफूट आणि आघाडीत झालेली बिघाडी यामुळे आता चौरंगी लढत निश्चित झाली आहे. जिल्ह्यात कोणत्याही मतदार संघावर कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. विद्यमान आमदारांच्या विजयात युती किंवा आघाडीचाच वाटा आहे. आता चारही पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्याने जिल्ह्यात खरी ताकद नेमकी कोणाची आहे, हे नेमकेपणाने समोर येईल. त्यातही चार पक्ष समोर आले तरी मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच होईल, असे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये तीन ठिकाणी युतीचे आणि दोन ठिकाणी आघाडीचे आमदार आहेत. या पाचही आमदारांच्या विजयात मित्रपक्षाचा वाटा आहे. त्यामुळे आता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.रत्नागिरी मतदार संघरत्नागिरीत राष्ट्रवादीचा आमदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला शिवसेनेची अंतर्गत मदत मिळत होती. आता शिवसेनाही स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रवादीला एकट्यालाच निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राष्ट्रवादीकडून उदय सामंत आणि भाजपकडून बाळ माने यांची नावे निश्चितच मानली जात आहेत. आता काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रसाद तथा बाबू पाटील आणि बंटी वणजू यांची तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि माजी तालुकाप्रमुख उदय बने यांची नावे चर्चेत आहेत.राजापूर-लांजा मतदार संघशिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथील लढत शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी असेल. येथे शिवसेनेकडून राजन साळवी आणि काँग्रेसकडून राजन देसाई यांचे नाव नक्की झाले आहे तर आता राष्ट्रवादीकडून अजित यशवंतराव यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघसध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांचे नाव नक्की आहे. या तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी असली तरी लियाकत शाह आणि रश्मी कदम यांची नावे उमेदवारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकम यांना तोटा होऊ शकतो. या तालुक्यातही भाजपची ताकद कमी असल्याने मुख्य लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच होईल, हे निश्चित आहे. भाजपकडून माधव गवळी किंवा गणेश चाचे यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.गुहागर-खेड मतदार संघमहाराष्ट्राचे कामगार मंत्री भास्कर जाधव यांनी येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून विनय नातू यांचे नाव निश्चित आहे. गतवेळी या मतदार संघात शिवसेना-भाजपची मते फुटल्यामुळे भास्कर जाधव निवडून आले होते. आता शिवसेनेकडून रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांचे नाव चर्चेत आहे. युतीची मते फुटणार असल्याने जाधव यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थात यावेळी जाधव यांना काँग्रेसकडून कसलेच सहकार्य मिळणार नाही, उलट काँग्रेसकडून उमेदवार उभा राहिला तर जाधव यांची मते कमी होण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून संदीप सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.दापोली-मंडणगड मतदार संघयेथे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी आहेत. भाजपची ताकद कमी असली तरी ती शिवसेनेला सहाय्य करणारी आहेत. भाजपकडून येथे तालुकाध्यक्ष केदार साठे यांचे नाव चर्चेत आहे. गेली २५ वर्षे आघाडीपैकी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे. मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाही. आता काँग्रेसकडून या मतदार संघासाठी माजी जिल्हाध्यक्ष सुजित झिमण यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीनेही या मतदार संघाची मागणी केली आहे. येथे संजय कदम आणि किशोर देसाई हे राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत.(प्रतिनिधी)उमेदवारांची शोधाशोधठाम विजयाचा दावा करणे कोणत्याही पक्षाला अशक्यजिल्ह्यात तुलनेने भाजप आणि काँग्रेसची ताकद कमीशिवसेना जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकावरचा पक्षशिवसेनाशी सामना करण्याची ताकद केवळ राष्ट्रवादीकडेयुती आणि आघाडी फिस्कटण्याची शक्यता कोणत्याही कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. जागा वाटपाचे वाद सुरू असले तरी ते पेल्यातील वादळ ठरतील, असे वाटत होते. पण हे वाद विकोपाला गेल्याने आता काही ठिकाणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे.