Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video
By अरुण आडिवरेकर | Updated: September 29, 2022 16:47 IST2022-09-29T16:22:22+5:302022-09-29T16:47:02+5:30
सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे.

Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video
रत्नागिरी : रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) पहाटे पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पावसाची तमा न बाळगता, पावसाच्या थारा अंगावर झेलत दुर्गामाता दौडमध्ये रत्नागिरीकरांनी सहभागी होत ही दौड पूर्ण केली.
सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे. सोमवारी घटस्थापनेपासून ही दौड सुरू झाली. ही दौड विजयादशमीपर्यंत शहर आणि परिसरात होणार आहे. हातात भगवा झेंडा, पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर फेटे बांधून स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने यात भाग घेतला होता.
या दौडला मारुती मंदिर येथून सकाळी ५.४५ वाजता सुरुवात झाली. सकाळी पावसाने हजेरी लावल्याने ही दौड पूर्ण होणार की, नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, पावसाची कोणतीही तमा न बाळगता, दौड पूर्ण करण्याच्या इच्छाशक्तीने सारे एकत्र आले आहे आणि भर पावसातही दौड यशस्वी करण्यात आली. मारुती मंदिर, पॉवर हाऊस, विश्वनगर, पॉलिटेक्निकल रोड, मारूती मंदिर अशी दौड काढण्यात आली. यावेळी विश्वनगर मित्रमंडळातर्फे विराजमान करण्यात आलेल्या देवीचे धारकऱ्यांनी दर्शन घेतले.
भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' pic.twitter.com/qgbsoDDWGR
— Lokmat (@lokmat) September 29, 2022