Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये
By शोभना कांबळे | Updated: February 7, 2026 18:13 IST2026-02-07T18:13:47+5:302026-02-07T18:13:56+5:30
अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब

Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. आत्तापर्यंत सर्वाधिक गुहागर (४२.४३ टक्के) त्या खालोखाल रत्नागिरी (४०.१५ टक्के) तालुक्यात मतदान झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकासाठी शनिवारी सकाळी साडे वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, सुरूवातीपासून मतदानाला संथ प्रतिसाद होता. अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब होत गेला.
शनिवारी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ११.२४ टक्के मतदान झाले. ११:३० वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले. तर पुढच्या दोन तासांपर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदार आहेत. यापैकी दुपारी दीड वाजेपर्यंत ४ लाख ६३ हजार ९०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या २,३७,७५३ तर पुरूष मतदारांची संख्या २, २६,१५० इतकी आहे.