शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रत्नागिरी जिल्हा परिषद : घरपट्टी थकबाकी ३ कोटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:13 AM

ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ३९ कोटी घरपट्टीची वसुलीकारखानदारीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेला घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत.

त्यामध्ये रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.दरम्यान, डोंगरदऱ्यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींमध्ये सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.

सन २०१६-१७च्या ४ कोटी ८२ लाख २६ हजार २४८ रुपये थकीत असलेल्या घरपट्टीपैकी ४ कोटी ४ लाख ३७ हजार ५५७ रुपये वसुली, सन २०१७-१८ च्या ३९ कोटी ९० लाख ३ हजार ५४८ रुपयांपैकी ३६ कोटी ३ लाख ९३ हजार २०८ रुपये घरपट्टीची वसुली करण्यात आली़.

जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला ४३ कोटी ४५ लाख ६४ हजार ७७९ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये वसुली करण्यात आली.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकीत रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये एवढी थकबाकी वसूल करायची आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी