शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

रत्नागिरी : नगराध्यक्षपदापदासाठीचे अर्ज अवैध, देवरूखात नगराध्यक्षपदाची समीकरणे बदलणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:10 PM

देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध अर्ज हे अवैधच ठरले. त्यामुळे देवरुख नगरपंचायत निवडणुकीचे समीकरणच बदलणार आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदापदासाठीचे अर्ज अवैधदेवरूखात नगराध्यक्षपदाची समीकरणे बदलणार?

सचिन मोहितेदेवरुख : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध अर्ज हे अवैधच ठरले. त्यामुळे देवरुख नगरपंचायत निवडणुकीचे समीकरणच बदलणार आहे.नगराध्यक्षपदापदासाठी सध्या तरी तीनच उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये शिवसेनेच्या धनश्री नंदादीप बोरकर, स्वाभिमानच्या मिताली तळेकर आणि अपक्ष अनघा निकम यांचा समावेश आहे. मिताली तळेकर या राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानमधून निवडणूक लढवित आहेत.

पक्षातून काढता पाय घेतलेल्या तळेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पाठिंबा देणार नाही. मात्र, अनन्या कांबळे यांच्या पाठीशी आघाडी उभी राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनन्या कांगणे यांना कुणबी सेनेचा पहिल्यापासूनच जोरदार पाठिंबा आहे, किंबहुना कुणबी सेनेच्या सहकार्यामुळेच त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

कुणबी समाजाच्या मतांवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. संपूर्ण समाज त्यांच्या पाठिशी आहे. कांगणे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरतोय, अशी स्थिती असताना १९ तारखेपूर्वी एका पक्षाने एबी फॉर्मची आॅफरही त्यांना जाहीर केली होती. मात्र, त्या अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्या.शिवसेनेचा मुख्य विरोधी पक्ष भाजप आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात नसल्यास भाजप - मनसे युतीदेखील अपक्ष असलेल्या अनघा कांगणे यांनाच पाठिंबा देऊ शकतील ? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

अशा प्रकारची बोलणीदेखील वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची गोपनीय माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कांगणे यांना कुणबी समाजाची एकगठ्ठा मते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजप युतीने पाठिंबा दर्शविल्यास अनघा कांगणे यांच्या रुपोन एक तगडे आव्हान नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उभे राहणार आहे.मिताली तळेकर यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची अशी स्वत:ची मते त्यांच्याकडे आहेत. याचबरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने सेनेत नसतानाही गत निवडणुकीत एका बाजूने किल्ला लढवित सेनेचा बालेकिल्ला राखला होता. त्यावेळी तब्बल सात नगरसेवक निवडून आणले होते.अनघा कांगणे यांना पाठिंबा?प्रस्थापित राजकीय पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अवैध ठरतात, ही राजकीय अपरिपक्वता असल्याची प्रतिक्रिया संगमेश्वर - चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी विरोधकांना चपराक देताना दिली. मात्र, नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले आहेत, तोच निकाल जिल्हा न्यायालयात कायम राहिला तर मात्र सगळीच समीकरणे बदलणार आहेत. कदाचित अपक्ष असलेल्या अनघा कांगणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबरच भाजपची युती पाठिंबा देऊ शकते? अशी चर्चा देवरुख शहरात ऐकायला मिळत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका