शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले : चारूदत्त आफळेबुवा, कीर्तन महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:04 IST

लखनौ अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारदत्त आफळेबुवा यांनी केले.

ठळक मुद्दे- रत्नागिरीतील कीर्तन महोत्सवाची सांगता टिळकांच्या नेतेपदासाठी लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात उसळला जनक्षोभ हिंदुस्थान वाचवण्यासाठी साऱ्यांनी बलवान व्हावेहिंदुस्थान जगाचे नेतृत्व करेल; सावरकरांनी वर्तवले होते भविष्यजनतेकडू जातपात न बघता, पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्या.

रत्नागिरी : लखनौ अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारदत्त आफळेबुवा यांनी केले.कीर्तनसंध्या आयोजित कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या कीर्तनात आफळेबुवा बोलत होते. रत्नागिरीकरांनी या कीर्तनाला प्रचंड गर्दी केली होती.

राजद्र्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. दरम्यान इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. टिळक सुटल्यानंतर लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. लखनौला जाण्यासाठी प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लोकांनी टिळकांना अभिवादन केले. टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गीमध्ये बसण्यास सांगितले. अखेर बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वत: बग्गी ओढली.

दक्षिण आफ्रिकेतील लढा संपवून मोहनदास गांधी भारतात परतले होते.  पहिल्या महायुध्दात इंग्रजांना विनाअट हिंदुस्थानी सैनिक मदत करतील, असा प्रस्ताव काँग्रेसने केला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा अंदाज होता. मात्र, इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता.भारताचा विजय नजीक असला की दुर्दैवाने आपला नेता जातो. इतिहास काळापासून हे आतापर्यंत दिसून आले आहे. स्वा. सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे.

हिंदुस्थानच्या नेत्याला सर्व हिंदुंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्या, असे भावनिक आवाहन बुवांनी केले. तिसऱ्या महायुध्दात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून साऱ्यांनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

राजा केळकर, हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई, आदित्य पोंक्षे यांनी संगीतसाथ केली तर निबंध कानिटकर यांनी निवेदन केले. आफळेबुवांच्या संकेतस्थळाचा प्रोमो दाखविण्यात आला. संकेत सरदेसाई यांनी ही वेबसाईट डिझाईन केली आहे.अखिल भारतीय कीर्तन संमेलन रत्नागिरीतदिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले.

कीर्तनसंध्या गेली सात वर्षे भव्यदिव्य स्वरूपात कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे जाहीर केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर