रत्नागिरी : वाटूळ घाटात चालत्या गाडीने घेतला पेट, जीवित हानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:34 IST2018-04-14T13:34:33+5:302018-04-14T13:34:33+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील वाटूळ येथील घाटामध्ये मारुती व्हगनॉर (एमएच १२ एच २० - ५३२५) या गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

रत्नागिरी : वाटूळ घाटात चालत्या गाडीने घेतला पेट, जीवित हानी नाही
वाटूळ : मुंबई - गोवा महामार्गावरील वाटूळ येथील घाटामध्ये मारुती व्हगनॉर (एमएच १२ एच २० - ५३२५) या गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
गाडीमालक ज्ञानदेव मारुती मामलुस्कर हे स्वत: व त्यांचा २५ वर्षीय भाचा रत्नागिरीहून कणकवलीकडे निघाले असताना वाटूळ घाटामधील चढावर बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली असता गाडीने अचानक पेट घेतला.
गाडीतील दोघांनीही बाहेर उडी घेत आपले साहित्य बाहेर काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. काही क्षणातच गाडीने पूर्ण पेट घेतला.
राजापूर पोलीस स्थानकाला माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. गाडीचे मालक पुण्याचे असून, आपल्या एका महत्त्वाच्या खासगी कामासाठी रत्नागिरीहून कणकवलीकडे निघाले होते.