रत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:59 IST2020-02-22T14:58:19+5:302020-02-22T14:59:25+5:30
रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरीत शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी मिरजोळे येथे जंगलमय भागात आंब्याच्या बागेतील एका कामगाराला तीव्र घाणेरडा वास आला. त्याने आपल्या मालकाला याची कल्पना दिली.
त्याचा मालक घटनास्थळी आला. तेथे दगडांखाली काहीतरी झाकून ठेवण्यात आले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने तातडीने याची कल्पना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर या दगडांखाली एका मुलाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
मिरजोळे भागातील एक शाळकरी मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. हा मृतदेह त्याचाच असल्याचा संशय आहे. मात्र, मृतदेह सडला असल्याने त्याबाबत लगेचच माहिती देणे अशक्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.