रत्नागिरी: एकीकडे भारत 'ऑपरेशन सिंदूर राबवत असतानाच रत्नागिरीत ऑपरेशन देशप्रेम राबवण्यात आले. पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर निंदा करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी चोप दिला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ही घटना गुरुवारी जांभूळफाटा येथे घडली. जखमी तरुण मूळचा चिपळूण गोवळकोट येथील असून, साध्या तो रत्नागिरीत राहत होता. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. एकीकडे भारत या जल्लोषात असताना रत्नागिरीतील एका आस्थापनेवर काम करणाऱ्या तरुणाने पाकिस्तानच्या जयघोषाच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते.या तरुणाने ठेवलेले हे स्टेट्स काही देशप्रेमी रत्नागिरीकरांच्या निदर्शनास आली, त्या तरुणाची माहिती काढल्यानंतर तो रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरातील एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करत असल्याची माहिती मिळाली रत्नागिरीकर तरुणांनी ते शोरूम गाठले त्यावेळी व्यवस्थापनाने पनाने या स्टेटसमुळे त्या तरुणाला आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. मात्र, या तरुणाला देशप्रेम शिकविण्याचा निश्चय केलेल्या रत्नागिरीकर तरुणांनी त्या तरुणाला गुरुवारी शोधून काढले. त्याला जांभूळफाटा येथे बोलाविले होते. त्याठिकाणी तो तरुण आला असता स्टेटसबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आपल्या पद्धतीने त्याची कानउघाडणी करत 'भारत माता की जय म्हणायला लावले भारताविरोधी तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे धर्मविरोधी मोबाइल स्टेटस ठेवल्याप्रकरणी या तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहेजिल्हा रुग्णालयात दंगा काबू पथक तैनातदरम्यान, देशविरोधी स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे.
स्टेटसवर पाकिस्तान प्रेम दाखविणाऱ्या तरुणाला रत्नागिरीकरांनी दिला चोप, जिल्हा रुग्णालयात दंगा काबू पथक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:13 IST