रत्नागिरी पाेलिस शिपाई भरतीसाठी २ एप्रिलला लेखी परीक्षा
By अरुण आडिवरेकर | Updated: March 31, 2023 14:01 IST2023-03-31T14:00:59+5:302023-03-31T14:01:28+5:30
रत्नागिरी : सन २०२१ मधील जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २ एप्रिल ...

रत्नागिरी पाेलिस शिपाई भरतीसाठी २ एप्रिलला लेखी परीक्षा
रत्नागिरी : सन २०२१ मधील जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २ एप्रिल २०२३ राेजी सकाळी ८:३० वाजता रत्नागिरी शहरातील विविध शाळा / महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ६,९१३ इतके उमेदवार पात्र ठरले आहेत.
या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी https://policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यास दिनांक २९/०३/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या प्रतिसह दिनांक २ राेजी सकाळी ६ वाजता उपस्थित राहावे. ही परीक्षा रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल, गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालय, श्रीमान भागाेजी शेठ कीर लाॅ काॅलेज, श्रीमान गंगाधर गाेविंद पटवर्धन इंग्लिश स्कूल (जीजीपीएस) आणि रा. भा. शिर्के प्रशाला येथे हाेणार आहे.
लेखी परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे www.ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना काही अडचण / समस्या असल्यास त्यांनी पोलिस नियंत्रण कक्ष रत्नागिरी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.