Ratnagiri Municipal Council provided insurance cover to the employees | रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच

रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत कर्मचारी कार्यरत, ३९ कर्मचाऱ्यांना लाभविमा कवच देणारी राज्यातील पहिलीच नगर परिषद

रत्नागिरी : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सारीच यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी नगर परिषद राज्यातील पहिली नगर परिषद असल्याचा दावा नगर परिषद प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य, पोलीस, परिचारिका, आशासेविका हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. नगर परिषदेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा ह्यजीवन अमर टर्म इन्शुरन्स विमाह्ण उतरविला आहे. नगर परिषदेतील ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम २५ लाख प्रती कर्मचारी आहे.

कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत नगर परिषदेतर्फे हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी ७ हजार ७६० हप्ता भरण्यात येणार आहे. याचा एकूण खर्च २ लाख ९९ हजार १३० रुपये एवढा आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना २५ लाखाचे विमा कवच पुरविले जाणार आहे.

Web Title: Ratnagiri Municipal Council provided insurance cover to the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.