शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:17 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

ठळक मुद्देअल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठएकही प्रस्ताव यावर्षी दाखल नाही

रत्नागिरी : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका - नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे कमाल दोन लाख रुपये अनुदान रूपात देण्यात येते. अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे.लाभार्थी शाळा, संस्थेमध्ये या अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालवणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा तसेच नगरपालिका व जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली चालवण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच यापूर्वी या योजनेंतर्गत पाच वेळा अनुदान दिलेल्या शाळा, संस्थाही पात्र नाहीत.शासनाकडून विविध समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडूनच निरूत्साह दाखविला जात आहे. त्यामुळे दरवर्षीच या योजनांचा निधी पडून राहात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठीही यावर्षी एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. योजनांचा लाभ घेण्याबाबत जनतेमध्येच उदासीनता दिसून येत आहे.अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे. मात्र, मुस्लिम धर्माव्यतिरिक्त इतर धर्मिय याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्वच धर्मियांमधील लोकप्रतिनिधींनी या योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कल्याणकारी योजना माहिती नसल्याने अनेक समाजातील गरजू व्यक्ती या योजनांपासून वंचित राहात आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी