रत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:37 IST2018-10-19T15:34:42+5:302018-10-19T15:37:42+5:30

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

Ratnagiri: On the Konkan Railway route for the Diwali, more trains and increased response to the passengers | रत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

रत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

ठळक मुद्देदिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्यामध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

त्यानुसार दिनांक ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे. ही गाडी रात्री १.१० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.

या गाडीचा परतीचा प्रवास त्याच दिवशी म्हणजे दिनांक ५, १२ व १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२० मिनिटांनी सावंतवाडीहून सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी तो लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबे घेत सावंतवाडीला जाणार आहे.

दुसरी विशेष गाडी लोकमान्य टर्मिनस ते थिवी (०१०४५/०१०४६) मार्गावर दिनांक २, ९ व १६ नोव्हेंबर २०१८ रोजी धावणार आहे. ही गाडी २२ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. वातानुकूलित, स्लीपर तसेच सर्वसाधारण श्रेणीचे डबे या गाडीला जोडण्यात येणार आहेत. ही गाडी लोकमान्य टर्मिनसहून रात्री १.१० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.५० मिनिटांनी ती गोव्यात थिवी स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचा परतीचा प्रवास थिवी स्थानकावरुन दुपारी २.२० मिनिटांनी सुरु होईल आणि मध्यरात्री १२.२० मिनिटांनी तो मुंबईत लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.

Web Title: Ratnagiri: On the Konkan Railway route for the Diwali, more trains and increased response to the passengers