शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रत्नागिरी : माहेरने आज्जीला पोहोचवले तिच्या परिवारापर्यंत, शस्त्रक्रियेसाठी आली होती वृध्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:20 PM

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सापडलेल्या आज्जीला माहेर संस्थेमुळे तिचे घर १५ दिवसांत सापडले. आज्जीला सुखरूप पाहून तिच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ठळक मुद्दे माहेरने आज्जीला पोहोचवले तिच्या परिवारापर्यंतरुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेसाठी आली होती वृध्दा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सापडलेल्या आज्जीला माहेर संस्थेमुळे तिचे घर १५ दिवसांत सापडले. आज्जीला सुखरूप पाहून तिच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला.येथील जिल्हा रूग्णालयाच्या अपघात विभागाजवळ सोमवार सकाळपासून सुमारे ६० ते ७० वयाची वृध्द महिला बसून होती. ती निराधार असेल, असे समजून जिल्हा रूग्णालयाकडून माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांना फोन करण्यात आला.

ही महिला निराधार असून तिला डोळ्यांनी दिसतही नाही. तिला माहेर संस्थेत प्रवेश मिळेल का? असे कांबळे यांना विचारण्यात आले. मी १५ मिनिटात रूग्णालयात पोहोचतो, असे कांबळे यांनी सांगितले.ते काहीवेळातच पत्नी विजयाला घेऊन जिल्हा रूग्णालयात पोहोचले. त्यांनी बाकावर झोपलेल्या आज्जीची चौकशी केली. आज्जीने आपली सर्व माहिती सांगितली. तिचे नाव लक्ष्मी तांबे असून ती चांदोर (ता. रत्नागिरी) येथील असल्याची माहिती दिली.

आपण निराधार असून, डोळ्याचे आॅपरेशन करायला दवाखान्यात आले होते, असे सांगितले. तिने आश्रमात राहण्याची तयारी दर्शविली. कांबळे यांनी तिला गाडीत बसवून माहेर संस्थेत आणले.१५ दिवस झाले तरी आजी घरी सोडा, असे म्हणाली नाही. चांदोर हे गाव पावस पूर्णगड पोलीस हद्दीत येत असल्याचे कांबळे यांना कळले. त्यांनी पूर्णगड पोलिसांना या आजीबद्दल माहिती दिली. या पोलीस ठाण्यात लक्ष्मी तांबे या महिलेची बेपत्ता नोंद तिच्या नातेवाइकांनी दिली होती.

आपली सासूबाई मिळाली व ती हातखंबा येथील माहेर संस्थेत आहे, हे समजल्यावर आजीच्या दोन सुना लगेच संस्थेत हजर झाल्या. सुना आपल्याला न्यायला आल्यात, हे पाहून आजीही खूश झाली आणि माहेरने आणखी एक घर जोडून दिले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी