शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अनिश्चित काळासाठी ‘रत्नागिरी गॅस’ बंद

By admin | Updated: June 29, 2014 00:57 IST

विशेष जपणुकीसाठी धांदल सुरू

संकेत गोयथळे ल्ल गुहागरगॅस पुरवठ्यामधील अनिश्चितता आणि त्यामुळे सातत्याने बंद होणारी वीज निर्र्मिती यामुळे रत्नागिरी वायू आणि ऊर्जा प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्प बंद केल्यानंतरही आतील यंत्रांची योग्य देखभाल (प्रिझर्व्हेशन) व्हावी, यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याने प्रकल्प बंद होत असल्याच्या मुद्द्याला दुजोरा मिळाला आहे.आता प्रकल्प बंद होत असल्याने पुढील काळातील देखभालीची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने आवश्यक साधनसामुग्रीची तयारी कंपनी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक त्या निविदा काढण्यात आल्या आहेत.एन्रॉन प्रकल्प बुडीत गेल्यानंतर पुंजलॉईड कंपनी यंत्रसामुग्रीची देखभाल करत होती. भारनियमनाचे संकट लक्षात घेऊन २००५ मध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा प्रकल्प रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प या नावाने सुरू केला. प्रकल्प सुरू करताना अनेक अडचणी आल्या. पुढील काळात कोट्यवधीची टर्बाईन्स व इतर यंत्रसामुग्री नव्याने बदलण्यात आली. त्यानंतर प्रकल्प सुरळीत सुरू झाला. गेली काही वर्षे प्रकल्प सुस्थितीत होता. त्यातून सरासरी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होत होती. एकदा १९00 मेगावॅट इतके वीज उत्पादनही या प्रकल्पाने केले. वीज निर्मितीसाठी आवश्यक गॅस रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून मिळत होता. मात्र, त्याच दरम्यान गॅस पुरवठ्याची ओरड सुरू झाली. पहिल्यांदा २६ जानेवारी २०१३ ला गॅसअभावी वीज निर्मिती बंद झाली. त्यानंतर कमी जास्त फरकाने ही स्थिती कायम राहिली. आता सप्टेंबर २०१३ पासून प्रकल्प बंद स्थितीत आहे. गॅस उपलब्धतेबाबत कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या प्रकल्पाचे प्रिझर्व्हेशन (विशेष जपणूक) करण्यासाठी मागविलेले ब्लोअर प्रकल्पामध्ये आले आहेत. पॉवर ब्लॉकमध्ये टर्बाईन व इलेक्ट्रॉनिक यंत्रणेसाठी आवश्यक वातावरण ठेवण्यासाठी ब्लोअरद्वारे गरम हवा बाहेर फेकली जाते. प्रिझर्व्हेशनचा दुसरा भाग म्हणून ’ह्युमिडिफायर’ची जाहीर निविदा काढण्यात आली आहे. पावसाळी व हिवाळी हंगामात हवेत आर्द्रता असते. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमधील छोटे कंडक्टर शॉर्ट होऊ शकतात यासाठी हवेतील आर्द्रता ’ह्युमिडिफायर’द्वारे काढली जाते. या दोन्ही यंत्रणा मागविण्यात येत असल्याने प्रकल्प बंद राहणार, यावर शिक्कामोेर्तब झाले आहे.