शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 22:32 IST

मृतांमध्ये तीन बहिणी आणि त्यातील एका महिलेचा पती अशा चौघांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: फिरण्यासाठी आरेवारे येथे गेलेल्या चौघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन बहिणी आणि त्यातील एका महिलेचा पती अशा चौघांचा समावेश आहे. पावसामुळे समुद्र खवळलेला होता आणि लाटांचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडाले. स्थानिक व्यावसायिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले. उज्मा शामशुद्दीन शेख (१८), उमेरा शामशुद्दीन शेख (२९, दोघी रा. मुंब्रा, ठाणे), जैनब जुनैद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०, दोन्ही रा. ओसवालनगर, रत्नागिरी), अशी या चौघांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मुंब्रा येथून उज्मा शेख, उमेरा शेख (२९) या दोघी जणी रत्नागिरीतील त्यांची बहीण जैनब काझी हिच्याकडे आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या तिघी आणि जैनब काझी हिचा पती जुनैद बशीर काझी असे चौघेजण सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते. या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. मात्र, समुद्र खवळलेला होता. त्यातच दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही आणि अचानक उसळलेल्या मोठ्या लाटेमुळे हे चौघेही पाण्यात ओढले गेले.जीव वाचवण्यासाठी त्यांचा आकांत सुरू झाला. काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला; परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचेही प्रयत्न असफल ठरले. दरम्यान, ग्रामीण पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. अखेर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना तातडीने तपासण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्या चौघांचीही प्राणज्योत मालवली होती.

आई-वडील सौदीला

या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या तीन बहिणींचे आई-वडील उंब्रा करण्यासाठी (पूजा करण्यासाठी) सौदी येथे गेले आहेत. यादरम्यान दोन बहिणी आपल्या रत्नागिरीतील बहिणीकडे आल्या होत्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात खूप मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू