रत्नागिरी : चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणारे पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:13 IST2018-04-20T16:13:39+5:302018-04-20T16:13:39+5:30

कोल्हापूरहून तस्करी करून चिपळूणमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सांबर शिंगांसह पाच तरुणांना चिपळूण पोलिसांनी गस्त घालताना पकडले व अधिक तपासासाठी वन खात्याकडे वर्ग केले. ही घटना गुरुवारी पहाटे ५ पूर्वी घडली.

Ratnagiri: The five accused who smuggled the sambar horn in Chiplun | रत्नागिरी : चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणारे पाच अटकेत

रत्नागिरी : चिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणारे पाच अटकेत

ठळक मुद्देचिपळुणात सांबर शिंगाची तस्करी करणारे पाच अटकेत तपास वन खात्याकडे वर्ग

चिपळूण : कोल्हापूरहून तस्करी करून चिपळूणमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सांबर शिंगांसह पाच तरुणांना चिपळूण पोलिसांनी गस्त घालताना पकडले व अधिक तपासासाठी वन खात्याकडे वर्ग केले. ही घटना गुरुवारी पहाटे ५ पूर्वी घडली.

कोल्हापूरहून सांबराची शिंगे घेऊन चिपळूण येथे काही तरुण विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाहब नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक अशोक दाभोळकर, हवालदार प्रदीप गमरे, राजेश नार्वेकर, गगनेश पटेकर, दीपक ओतारी यांनी गस्त सुरु केली.

चिपळूण - गुहागर बायपास रोडवर पाण्याच्या टाकीजवळ असेंट कार (एमएच ४७ सी ८०१८) मध्ये आरोपी चालक अजय रघुनाथ साळुंखे (३६, गोरेगाव, मुंबई), समीर राजाराम नलावडे (३४, कोल्हापूर), दीपक नामदेव मुसळे (३२, शिवाजीपेठ, कोल्हापूर), राकेश राजेंद्र भोसले (३७, कोल्हापूर), सागर राजाराम नलावडे (३०, कोल्हापूर) आढळले.

परिक्षेत्र वन अधिकारी सचिन नीलख, वनपाल आर. बी. पाताडे यांनी चौकशी करून आरोपींना चिपळूण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. ही शिंगे २० वर्षांपूर्वीची असावीत, अशी चर्चा होती. सायंकाळी उशिरा सर्व आरोपींना रत्नागिरी येथील जिल्हा विशेष कारागृहात पाठविण्यात आले.

वन खात्याकडे वर्ग

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याकडे दोन सांबर शिंगे असल्याची कबुली दिली. त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी अधिक चौकशी करून त्याचा तपास वन खात्याकडे वर्ग केला.
 

Web Title: Ratnagiri: The five accused who smuggled the sambar horn in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.