युपीआय पेमेंटमुळे सुट्या पैशांवरून होणारे वाद मिटले, एसटीच्या रत्नागिरी विभागाला किती उत्पन्न मिळाले.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:26 IST2025-02-04T16:25:50+5:302025-02-04T16:26:13+5:30
रत्नागिरी : तिकीट काढल्यानंतर सुट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये हाेणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय ...

युपीआय पेमेंटमुळे सुट्या पैशांवरून होणारे वाद मिटले, एसटीच्या रत्नागिरी विभागाला किती उत्पन्न मिळाले.. वाचा
रत्नागिरी : तिकीट काढल्यानंतर सुट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये हाेणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. यामुळे गाड्यांमध्ये हाेणारे वाद तुर्तास टळले असून, अवघ्या बारा दिवसात युपीआयद्वारे तिकीट काढल्यामुळे रत्नागिरी विभागाला २४ लाख ५६ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी गाड्यांमध्ये तिकीट काढताना सुट्या पैशांची कायम समस्या निर्माण हाेते. ही समस्या सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाइलद्वारे ऑनलाइन व्यवहार करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून सुरू हाेती. त्यानुसार महामंडळाने अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ईटीआयएम) सर्व आगारांना दोन महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिली आहे.
या प्रणालीमुळे प्रवासी युपीआय क्युआर कोडचा वापर करून तिकीट काढू शकतात. त्यामुळे जेवढे तिकीटाचे पैस तेवढेच पैसे देणे सुलभ झाले आहे. या प्रणालीमुळे सुट्या पैशांची भासणारी चणचण दूर झाली आहे.
तिकीट दर वाढण्यापूर्वीचे उत्पन्न (रुपयात)
दिनांक युपीआयद्वारे पैसे देऊन
२० जानेवारी १.८० ६२.००
२१ जानेवारी १.६४ ५७.७८
२२ जानेवारी १.४३ ५७.५८
२३ जानेवारी १.५४ ५५.५४
२४ जानेवारी १.२१ ५७.२५
तिकीट दर वाढल्यानंतर उत्पन्न
दिनांक युपीआयद्वारे पैसे देऊन
२५ जानेवारी १.६२ ५९.९१
२६ जानेवारी २.९० ६२.१०
२७ जानेवारी २.६९ ४९.२८
२८ जानेवारी २.१४ ६९.४९
२९ जानेवारी २.२६ ६३.३५
३० जानेवारी २.६९ ६३.२५
३१ जानेवारी २.६४ ६६.२१
सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकडविरहीत (कॅशलेस) व्यवहार केले जात आहेत. एसटी महामंडळातर्फेही प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी