रत्नागिरी जिल्हा विकास निर्देशांकात राज्यात प्रथम, जिल्हाधिकारी उद्या मुंबईत करणार सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:32 IST2025-03-11T17:31:33+5:302025-03-11T17:32:30+5:30

रत्नागिरी : पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’तर्फे राज्यातील जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरींच्या विविध विकास निर्देशांकांबाबत विश्लेषण करण्यात आले. ...

Ratnagiri District ranks first in the state in the development index, District Collector will present in Mumbai tomorrow | रत्नागिरी जिल्हा विकास निर्देशांकात राज्यात प्रथम, जिल्हाधिकारी उद्या मुंबईत करणार सादरीकरण

रत्नागिरी जिल्हा विकास निर्देशांकात राज्यात प्रथम, जिल्हाधिकारी उद्या मुंबईत करणार सादरीकरण

रत्नागिरी : पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’तर्फे राज्यातील जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरींच्या विविध विकास निर्देशांकांबाबत विश्लेषण करण्यात आले. यानुसार जिल्हा निर्देशांकबाबतचे पुरस्कार जाहीर केले आहेत. या जिल्हा निर्देशांक उपक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांबाबत प्रथम क्रमांक नोंदवला. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’तर्फे राज्यातील जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरींच्या विविध विकास निर्देशांकांबाबत विश्लेषण केले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक नोंदवला असून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या निर्देशांकाचे सादरीकरण दिनांक १२ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून त्यावेळी हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

गतवर्षी आणि यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे. आयोजकांकडून पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच विभागाचे अधिकारी यांचे योगदान असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांचे अभिनंदन केले.

Web Title: Ratnagiri District ranks first in the state in the development index, District Collector will present in Mumbai tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.