शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 2:24 PM

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरीमॉर्निंग वॉकच्या माध्यमातून शासकीय वास्तूंना भेटी देण्याचा धडाका

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावल्याने आता अनेक कार्यालयांनी साहेब कधीही आपल्या कार्यालयात थडकतील, याचा धसका घेतला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची स्वतंत्र अशी वेगळी शैली असते, त्यामुळे तो अधिकारी बदलून गेला तरी त्याची ती विशिष्ट शैली नागरिकांच्या स्मरणात रहाते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही रत्नागिरीत आल्यानंतरच रत्नागिरीची ओळख स्वत:च करून घेण्याच्या आपल्या या वेगळ्या शैलीचे दर्शन घडविले आहे. रत्नागिरीत आल्यानंतरच अवघ्या पंधरा दिवसांतच त्यांनी ही मॉर्निंग वॉक मोहीम राबविण्यास सुरूवात केली.

पहिल्यांदा त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन तिथली कार्यालये, गळक्या इमारती, विद्यार्थी - विद्यार्थीनींच्या दुरवस्था झालेली वसतीगृहे यांची पाहाणी केली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांशीही हितगुज करताना त्यांना येथील समस्या अधिकच जाणवल्या. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्या समस्या समजून घेत आहेत, या भावनेने त्या मुलांनाही कमालीचा आनंद झाला होता.

त्यानंतर दोन - तीन दिवसांत त्यांनी थिबा पॅलेस, प्रादेशिक मनोरूग्णालय, जिल्हा रूग्णालये यांनाही अकस्मात भेट देवून तिथल्या इमारतींची, रूग्णांसाठी असलेल्या सोयी सुविधांची पाहाणी केल्याने येथील गैरसोयी, समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या.

या कालावधीत त्यांनी काही शाळांचीही पाहाणी केली. तिथल्या छोट्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यांनी आवश्यक असलेल्या काही सूचनाही त्यांना केल्या. जिल्हाधिकारी यांनी सोबतीला कोणतीही यंत्रणा न घेता, एकट्याने जावून पाहाणी करण्याच्या या घटना आत्तापर्यंतच्या रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्या आहेत.जिल्हाधिकारी कुठल्याही क्षणी आपल्या कार्यालयात येवून थडकतील, हा धसका मात्र, इतर कार्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे या भीतीने ही कार्यालये आपले कामकाज योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करू लागली आहेत, हा सकारात्मक बदलही लक्षात घ्यायला हवा.

आताही तालुक्याच्या दौऱ्यावर जाऊन तिथली पाहाणी करून ते समस्या समजावून घेत आहेत. नागरिकांनी आपल्या पर्यंत समस्या आणाव्यात यापेक्षाही आपण त्यांच्यापर्यंत अधिकाधीक पोहोचून त्या समजून घ्याव्यात, या त्यांच्या तळमळीला दाद द्यायलाच हवी.एकंदरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे सुरूवातीचे मॉर्निंग वॉक रत्नागिरीतील विविध समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास फलद्रुप ठरले असून आता या समस्या लवकर सुटाव्यात तसेच शासकीय कार्यालयांच्या कामकाजात सकारात्मक बदल व्हावेत, अशी अपेक्षा सामान्य रत्नागिरीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी