रत्नागिरी :जमिनीच्या वादातून कुटुंबाला बाराजणांची मारहाण, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:05 IST2018-11-12T15:57:19+5:302018-11-12T16:05:41+5:30

खेड तालुक्यातील कळंबणी हंबीरवाडी येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून बाराजणांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून त्या घरातील माणसांना बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Ratnagiri: In the dispute over land, twelve people were beaten up and two were injured | रत्नागिरी :जमिनीच्या वादातून कुटुंबाला बाराजणांची मारहाण, दोघे जखमी

रत्नागिरी :जमिनीच्या वादातून कुटुंबाला बाराजणांची मारहाण, दोघे जखमी

ठळक मुद्देजमिनीच्या वादातून कुटुंबाला बाराजणांची मारहाणदोघे जखमी, बारा जणांवर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील कळंबणी हंबीरवाडी येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून बाराजणांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून त्या घरातील माणसांना बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कृष्णा हंबीर हे आपल्या कुटुंबीयांसह कळंबणी हंबीर वाडी येथे राहतात. जमिनीच्या वादातून त्यांचे वाडीतील राहणाऱ्या भावकी सोबत वितुष्ट निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी अजित हंबीर यांनी जमिनीच्या वादाबाबत न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता.

त्याचा राग मनात धरून भावकीतील बाराजणांनी हंबीर यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश धोंडे व हवालदार हनुमंत नलावडे करत आहेत.

Web Title: Ratnagiri: In the dispute over land, twelve people were beaten up and two were injured