हाथरस दुर्घटनेविरोधात रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 18:21 IST2020-10-05T18:19:02+5:302020-10-05T18:21:48+5:30
Hathras Gangrape, Ratnagiri, congres andolan हाथरस (उत्तरप्रदेश) दुर्घटनेचा निषेध करून त्यातील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

हाथरस दुर्घटनेविरोधात रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
रत्नागिरी : हाथरस (उत्तरप्रदेश) दुर्घटनेचा निषेध करून त्यातील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. योगी आदित्यनाथ सरकारच्या मनमानी, असंवैधानिक कृत्याविरोधी घोषणा देण्यात आल्या.
हाथरस येथील दलित समाजातील १९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल करण्यात आले. या घृणास्पद घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबाच्या घराजवळ शेकडो पोलिस तैनात करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याशी अत्यंत हीन पातळीवरचा व्यवहार करून त्यांना व प्रियांका गांधी यांना अटक केली. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बेछूट लाठीमार करण्यात आला.
या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातही आंदोलन छेडण्यात आले आहे.
यावेळी कपिल नागवेकर, दत्ता परकर, स्नेहा पिलणकर, अश्विनी भुस्कुटे, अॅड. अश्विनी आगाशे, रिजवाना शेख, सचिन मालवणकर, संदीप मोहिते, अन्वर काद्री आंदोलनात सहभागी झाले होते.