शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जप्तीला मिळाली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:36 IST

रत्नागिरी : रिसॉर्ट मुदतीआधी बंद केल्याने झालेल्या नुकसानापोटी जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील वस्तू जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत प्रशासनाकडून ...

रत्नागिरी : रिसॉर्ट मुदतीआधी बंद केल्याने झालेल्या नुकसानापोटी जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील वस्तू जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत प्रशासनाकडून न्यायालयात स्थगितीसाठी याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे.रत्नसागर रिसॉर्ट मुदतीआधी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने आपले नुकसान झाल्याचे संचालक प्रतापसिंहसावंत यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायायलात दावा दाखल केला. न्यायालयाने या भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले आणि जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार आपण या कारवाईसाठी आदेशासह आल्याचे सावंत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.

शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा विषय दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होता. आपल्या रिसॉर्टची मुदत बाकी असतानाही ते प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बंद केले. त्यामुळे आपण जिल्हा न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणी ९ कोटी २५ लाख रूपयांची भरपाई प्रशासनाने सावंत यांना द्यावी, भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील सामान जप्त करून त्यातून ते वसूल करावेत, असे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, भरपाई न मिळाल्याने न्यायालयाच्या या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह कार्यालयात नव्हते. मात्र, सावंत यांनी सोबत आणलेल्या व्यक्तींच्या सहाय्याने त्यांच्या कक्षातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तातडीने याबाबत जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी अभियोक्ता अनिरुद्ध फणसेकर यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने काम पाहिले. त्यानंतर न्यायालयाने या कारवाईला तातडीने स्थगिती दिली आहे.

आदेशात नेमके काय?न्यायालयाने जप्तीबाबत काय आदेश दिले आहेत, हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी तो आदेश दाखवण्याची मागणी करूनही सावंत यांनी पत्रकारांना आदेश दाखवले नाहीत. त्यामुळे त्यात नेमके काय नमूद केले होते, हे कळू शकले नाही. मात्र या कारवाईला १६ एप्रिलपर्यंत मुदत असल्याचा मुद्दा प्रशासनाकडून मांडण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी