शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:47 IST

Ratnagiri pharmacy student Suicide News: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिपळून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरवात केली आहे. सगळे व्यवस्थित सुरू असतानाही मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. 

ओवेस जुलफीकार मुल्ला (वय, २२) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता आणि कुटुंबासह चिपळूण शहरातील वाणी अळी येथे एकता अपार्टमेंटमध्ये राहत होता. तर,  ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला. परंतु, बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने कुटुंब चिंतेत पडले. त्यांनी ओवेसला बाहेरून आवाज दिला. परंतु, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यावेळी ओवेस हा शौचालयातील लोखंडी ग्रीलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती चिपळून पोलिसांनी दिली.

सगळे व्यवस्थित सुरू असताना ओवेसने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या मृत्यूने कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :ChiplunचिपळुणMaharashtraमहाराष्ट्रRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी