शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दापोलीत दुर्मीळ समुद्री कावळ्याला जीवदान, भारतात दिसतो क्वचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:03 IST

आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले

दापोली : तालुक्यातील मुर्डी समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी स्थानिकांना माेठा समुद्री कावळा (मुखवटाधारी बुबी) हा दुर्मीळ पक्षी आढळला. हा पक्षी प्रामुख्याने हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागराच्या दुर्गम भागांत राहतो. या पक्षाला मनित बाईत, प्रतीक बाईत या दोघांनी जीवदान दिले आहे.या पक्षाला मास्क्ड बुबी (masked booby) अर्थातच मुखवटाधारी बुबी किंवा मोठा समुद्री कावळा म्हणतात. आंजर्ले मुर्डी गावातील स्थानिक शेतकरी वैभव झगडे यांनी आपल्या शेतात या पक्ष्याला थकलेल्या अवस्थेत पाहिले. तो हालचाल करू शकत नव्हता, पंख पूर्णपणे ओले झालेले होते आणि तो अत्यंत कमकुवत दिसत होता. त्यांनी तातडीने ही माहिती दापोली वनविभागाला दिली.वनविभागाच्या समन्वयाने, वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर संस्थेचे प्रशिक्षित सदस्य मनीत आणि प्रतीक बाईत यांनी घटनास्थळी पोहोचून पक्ष्याची तपासणी केली. पक्ष्याला सुरक्षितरीत्या उचलून प्राथमिक उपचार दिले गेले.हा पक्षी कोणत्याही साधारण प्रजातीचा नसून, समुद्राच्या दुर्गम भागात राहणाऱ्या दुर्मीळ प्रजातींपैकी एक आहे. भारतात तो वादळानंतर किंवा अन्नशोधाच्या कारणाने क्वचितच दिसतो. शनिवारी संध्याकाळी चार वाजता या पक्ष्याला आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. समुद्राच्या दिशेने पंख पसरताच, तेथील नागरिकांनी जल्लोष केला. या दुर्मीळ पक्ष्याला वाचवणाऱ्या नागरिकांचे आणि वनविभागाचे कौतुक होत आहे.