रामपूरच्या महिला सरपंचांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:22 IST2019-02-06T17:22:42+5:302019-02-06T17:22:56+5:30
चिपळूण तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच श्रीया रावराणे (३५, मार्गताम्हाणे) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. रावराणे यांचा चिपळुणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

रामपूरच्या महिला सरपंचांची आत्महत्या
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच श्रीया रावराणे (३५, मार्गताम्हाणे) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. रावराणे यांचा चिपळुणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
श्रीया रावराणे या रामपूरच्या सरंपचपदी गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत होत्या. २०१७मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी गावातील विविध विकासकामे मार्गी लावल्याने कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून त्यांनी नाव कमावले होते.
सहा ते सात वर्षांपूर्वी त्यांचा धनंजय रावराणे यांच्याशी विवाह झाला होता. रावराणे यांचा बिल्डींग मटेरिअल सप्लायचा व्यवसाय आहे.त्यांना चिपळूणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.