शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

प्रतीकात्मक जादूटोणा करत मंडणगडमध्ये रामदास कदम यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:46 PM

मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत रामदास कदम यांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषण्यांच्या गजरात निदर्शने केली.

ठळक मुद्देप्रतीकात्मक जादूटोणा करत मंडणगडमध्ये रामदास कदम यांचा निषेधराष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तहसीलदारांना निवेदन

मंडणगड/रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम हे बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात व जादूटोणा करतात. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसमार्फतरामदास कदम यांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषण्यांच्या गजरात निदर्शने केली.पालकमंत्री रामदास कदम यांच्या २९ आॅगस्टच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली होती. प्रत्युत्तरादाखल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काका शिगवण यांना मारहाण केली. याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पण गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

अखेर १२ दिवसानंतर गुन्हा नोंद केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी रॅली काढून रामदास कदम यांना अटक करा, या मागणीसाठी निदर्शने केली. मंडणगड तहसीलदार कार्यालयावर कार्यकर्त्यांनी मोर्चाने जाउन निवेदन दिले.कोकणात बंगाली बाबांचे आगमन होत आहे, सावध राहा, गावोगावी खोटी पत्रे पाठविणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांचा निषेध, लोकांची दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांचा जाहीर निषेध, कोकणाला शिव्या घालणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असे फलक घेउन कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.गेल्या आठवड्यात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या रात्रीस खेळ चाले या बातमीच्या पोस्टरचा या रॅलीत समावेश करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक जादूटोणा करत रामदास कदम यांचा निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्य उमेद जाधव, पंचायत समिती सदस्य महामूलकर, काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, राजाराम लेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस