राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Updated: January 22, 2024 15:28 IST2024-01-22T15:28:20+5:302024-01-22T15:28:47+5:30
रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील ...

राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत
रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील हा अभूतपूर्व साेहळा रत्नागिरीतील नागरिकांनाही पाहता यावा यासाठी थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे आपणही या क्षणाचे साक्षीदार बनलाे. रत्नागिरीचा हा पॅटर्न राज्यात नव्हे तर देशातही राबवला गेला, असे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
असंख्य भारतीयांचे स्वप्न साकार होत असून, रामभक्तांसाठी आजचा दिवस उत्सवाचा असणार आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु असताना तो अभूतपूर्व सोहळा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जनतेसमवेत जयेश मंगल कार्यालय येथे थेट पाहिला. यावेळी ते बाेलत हाेते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील हा अभूतपूर्व सोहळा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता यावा यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. तो सोहळा त्यांनी जनतेसोबत उपस्थित राहून पाहिला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, ॲड. राजशेखर मलुष्टे, बाळू साळवी, किशोर मोरे, अलिमिया काझी, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, अभिजित गोडबोले, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर यांच्यासह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.