शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राजापुरात मान्यताप्राप्त एस. टी. कामगार सेना संघटनेत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:23 PM

मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देराजापूर आगार शिवसेनामय करण्याचा निर्धार : आमदार राजन साळवी राजापुरात निवडणुकीपूर्वी वातावरण तापू लागले.

राजापूर : राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे. यामधील बहुतांश कर्मचाऱ्यांनी मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच अध्यक्ष व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. टी. कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेत फूट पडल्याचे समोर आले आहे.राजापूर आगारातील एस. टी. कामगार संघटनेचे माजी सचिव श्रीपाद कुलकर्णी व इंटकचे दहिफडे यांच्यासह निवास माळी, व्ही. व्ही. पोवार, हुसेन इनामदार, सुनील नाकील, टी. के. पाटील, शीतल पाटील, भास्कर जाधव, आर. एस. भाट, विशाल कोळी, भरत दवडे, व्यंकट घुळे, वाय. बी. आयवाल, डी. वी. देशमुख, एस. एन. घुगे, व्ही. एल. शिरसाट, चंदन शिंदे, एम. पी. हळदंडवरू, एस. बी. हजारे, एन. ए. मुजावर, सचिन पाटील, एस. एन. डोंगरे, एन. एम. जाधव, अमित कदम, इस्माईल मुसारी यांच्यासह अन्य कामगारांनी कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कामगार सेनेचे अनिल कुवेसकर, दिलीप पाटील, प्रकाश झोरे, संतोष गोटम, सत्यवान चव्हाण, पम्या सावंत आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला सेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तालुका सभापती अभिजीत तेली, उपसभापती प्रशांत गावकर, उपतालुका प्रमुख तात्या सरवणकर, विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, विभागप्रमुख गणेश तावडे, नरेश दुधवडकर, संतोष हातनकर, राजा काजवे, नरेश शेलार, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, नगरसेवक विनय गुरव, सौरभ खडपे, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रकाश गुरव, कमलाकर कदम, दशरथ दुधवडकर, सुशांत मराठे, नितेश सावंत, मंदार बावधनकर तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी शिवसेनाएस. टी. कर्मचाऱ्यांच्या कामगार सेनतील प्रवेशाने राजापूर आगारातील मान्यताप्राप्त संघटनेत मोठी फूट पडली आहे. आता या नवीन प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना असणार आहे, असा इशारा मान्यताप्राप्त संघटनेला देण्यात आला आहे. राजापूर आगार आता लवकरच पूर्णपणे शिवसेनामय होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरी