राजापुरची गंगा अंतर्धान पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:32 IST2019-06-27T20:29:24+5:302019-06-27T20:32:54+5:30

सुमारे ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला राजापुरची गंगा अंतर्धान पावली. यापूर्वी २५ एप्रिलला सकाळी सात वाजता गंगेचे आगमन झाले होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाºया गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात मागील काही

Rajapur's Ganges interrupted | राजापुरची गंगा अंतर्धान पावली

राजापुरची गंगा अंतर्धान पावली

ठळक मुद्देगंगा अंतर्धान पावल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असुन गेले दोन दिवस पावसाला पुन्हा जोर आला आहे.

राजापूर : सुमारे ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला राजापुरची गंगा अंतर्धान पावली. यापूर्वी २५ एप्रिलला सकाळी सात वाजता गंगेचे आगमन झाले होते.
यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाºया गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात मागील काही वर्षात बदल झाला आहे. त्यामुळे समस्त भाविक बुचकळ्यात सापडले होते. गतवर्षी झालेल्या गमनानंतर यावर्षी २५ एप्रिलला सकाळी ७ वाजता गंगेचे आगमन झाले होते. त्यानंतर तिचे वास्तव्य होते. गंगेच्या वास्तव्य काळात पावसावर परिणाम झाला होता व पाऊस देखील लांबला होता. परिणामी जून महिन्याच्या सुरवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.  आपल्या ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला गंगेचे निर्गमन झाले. गंगा अंतर्धान पावल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असुन गेले दोन दिवस पावसाला पुन्हा जोर आला आहे.

Web Title: Rajapur's Ganges interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.