राजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा, चांदेराई भागातही पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:51 PM2020-10-15T14:51:20+5:302020-10-15T14:52:14+5:30

rain, rajapur, ratnagirinews बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड, दापोली आदी तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दुपारपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या. राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शहरात पुराचे पाणी शिरले होते. शहरातील जवाहर चौकापर्यंत पाणी आले होते. तर रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई भागातही पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.

Rajapur is surrounded by rain water and flood water in Chanderai area | राजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा, चांदेराई भागातही पुराचे पाणी

राजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा, चांदेराई भागातही पुराचे पाणी

Next
ठळक मुद्देराजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा चांदेराई भागातही पुराचे पाणी

रत्नागिरी : बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड, दापोली आदी तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दुपारपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या. राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शहरात पुराचे पाणी शिरले होते. शहरातील जवाहर चौकापर्यंत पाणी आले होते. तर रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई भागातही पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.

या पावसाला वाऱ्याचाही जोर असल्याने अनेक ठिकाणी रात्रीच विद्युत पुरवठा खंडित झाला. गुरूवारी सकाळपर्यंत अनेक भागात वीज गेलेली होती. पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आलेल्या नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार, खेड तालुक्यातील पन्हाळजे येथील रस्ता पावसामुळे खचला असून येथून एकेरी वाहतूक सुरळीत सुरु आहे.

चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील शंकर बापू मांजलेकर यांच्या वाड्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. चिंचघर-कोरेगाव-बहिरवली रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी देखील एकेरी वाहतूक सुरु आहे. दाभीळ, सातवीणगाव, आयनी रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता खराब झाला आहे. याठिकाणीही एकेरी वाहतूक सुरु आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सोलकरवाडी येथील जयराम हसम यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले आहे. घरातील ८ जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कडवई येथील सुनंदा गौराजी कांबळे यांच्या घराचे ३७,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथे ५ घरे, ५ गोठे, दुकान यांच नुकसान झाले आहे. धोपेश्वर येथे १ घर १ गोठा यांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Rajapur is surrounded by rain water and flood water in Chanderai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.