शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 4:57 PM

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली.  अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.

ठळक मुद्देराजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव कुंडे पाण्याने भरली : १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन

राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली.  अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोव्हेंबर २०१८ ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहून अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.गतवेळी १५ नोव्हेंबरला गंगा अंतर्धान पावल्यानंतर सुमारे १६० दिवसांनंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अवतीर्ण झाली. गंगेच्या पुजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर काळे यांनी गंगापुत्रांसहीत इतरत्र याची माहिती दिली.

राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव

गंगा आल्याचे वृत्त क्षेत्राच्या आजूबाजूला पसरताच अनेकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. त्यावेळी मुख्य असलेल्या काशीकुंडासहीत अन्य कुंडे तुडुंब पाण्याने भरली होती तर काशीकुंडाच्याच बाजूला असलेल्या गोमुखातून पाणी वाहत होते. गंगेचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर भाविकांची गंगाक्षेत्रावर रिघ सुरू होती.राजापूर शहराच्या पुरातन ओळख सांगणाऱ्या ठळक बाबींमध्ये गंगेचा उल्लेख कायम केला जातो. दर तीन वर्षांनी अवतीर्ण होणारी गंगा इतिहास काळापासून प्रचलित आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट, कवी मोरोपंत यांनी राजापूरच्या गंगाक्षेत्राला भेट दिल्याची माहिती इतिहासातून मिळते.

या गंगेचा संबंध काशी या क्षेत्राशी पूर्वापार जोडला जातो. या गंगेच्या आगमनाबाबत पूर्वापार कथा प्रचलित आहे. मागील काही वर्षांमध्ये तिच्या आगमन व गमन या नियमिततेमध्ये बदल झाला असून त्यामुळे दर तीन वर्षांनी या तिच्या आगमन काळाला छेद गेला आहे. यापूर्वी सन २००४ साली गंगेचा धुतपापेश्वरशी विवाह सोहळा पार पडला होता. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी