राजापूर किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस, कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:39 IST2021-05-16T13:38:39+5:302021-05-16T13:39:09+5:30
जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत.

राजापूर किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस, कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समुद्रकिनारपट्टीवर वारे वाहू लागले आहेत़ वाऱ्याचा वेग कमी असला तरी पावसाची संततधार जाेरात आहे. किनारपट्टीतील आंबाेळगड, मुसाकाझी, आवळीचीवाडी या भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. काेकण किनारपट्टीवर रविवारी ताेक्ते वादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर ताेक्ते वादळामुळे माेठ्या लाटा उसळल्या हाेत्या. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात कमी वेगाने वारे वाहू लागले हाेते. मात्र, पावसाची संततधार सुरूच हाेती. दुपारी १२़ २० च्या दरम्याने हे वादळ राजापूरच्या दिशेने सरकले आणि किनारपट्टीवर वारे वाहू लागले.
राजापूर तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबाेळगड, मुसाकाझी या भागात वाऱ्यासह पाऊस काेसळत हाेता़ वादळाच्या पार्श्वभूमीवर आंबाेळगड येथील ६८ कुटुंबातील २५४ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबराेबर मुसाकाझी येथील दाेन कुटुंब, आवळीचीवाडी येथील ७ कुटुंबातील ३५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. नाटे आणि परिसरातही वारे वाहू लागले असून, पावसानेही हजेरी लावली आहे. जैतापूर परिसरात वाऱ्यामुळे घरांची पडझडही झाली आहे़ तसेच राजापूर - डाेंगर मार्गावर झाड काेसळून वाहतूक ठप्प झाली आहे.