शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळमालकांचे ऊसदर कमी ठेवण्याचे रॅकेट

By admin | Updated: October 30, 2015 23:23 IST

पन्हाळा तालुका : गुऱ्हाळमालकांनी एफआरपीप्रमाणे दर द्यावा; शेतकरी संघटना आंदोलन करणार

नितीन भगवान -- पन्हाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखाने, गुऱ्हाळ मालकांकडून कमी दर मिळाल्याने अडचणीत आला आहे. गुऱ्हाळ मालकांनीही एफआरपीप्रमाणेच दर देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तालुक्यात ऊसदर कमी ठेवण्यासाठी गुऱ्हाळचालकांनी ‘रॅकेट’ तयार केले आहे. याप्रश्नी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.पन्हाळा तालुक्यात एक खासगी व एक सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आहे. एक सहकारी साखर कारखाना करवीरमध्ये आहे; पण ऊसक्षेत्र मात्र पन्हाळा तालुक्यातील जादा आहे. तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊसदर कमी देऊन अद्याप शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी देणेही थकीत ठेवले आहे. चालूवर्षी गळीत हंगामास आता सुरुवात झाली आहे; पण गेल्या हंगामातील अद्याप पैसे न मिळाल्याने प्रापंचिक खर्च व दैनंदिन अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच सोसायट्या व बँक प्रकरणास मर्यादा येऊ लागल्याने शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळमालकांना देऊ लागले आहेत; परंतु पन्हाळा तालुक्यातील गुऱ्हाळमालकांनी अघोषित एकी केली असून, कमीतकमी दर देण्याची एकी केली असल्याची गुऱ्हाळास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. शासनाकडून गुऱ्हाळघरांची मोजदाद, तेथील स्वच्छता. शेतकऱ्यांना देण्यात येणारा दर, रोजचे उत्पादन, उत्पादन खर्चासाठी होणारा खर्च या सर्वांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे ऊस लागवडीचे खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऊस बेणे, मशागत, लागवड, मजुरी, खते, औषधे याच्या खर्चाबरोबरच चालू हंगामात कमी पडणाऱ्या पावसामुळे पाणी देण्याचा आॅगस्टपासूनचा अतिरिक्त जादा खर्च, त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च व मिळणारा दर यामुळे शेतकरी सध्या अर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते श्रीकांत घाटगे यांना या गुऱ्हाळमालकांच्या मनमानीबाबत विचारले असता म्हणाले की, गुऱ्हाळमालक शेतकऱ्यांची लूट करीत असल्याबद्दलची वस्तुस्थिती सत्य असल्याचे सांगितले. उसाला १४०० ते १५०० भावगतवर्षी गुऱ्हाळमालक २२०० ते २५०० रु. टन याप्रमाणे उसाला दर देत होते. तोच दर चालू वर्षी १४०० ते १५०० रु. देताना दिसत आहेत. पन्हाळा तालुक्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते आहे. चालूवर्षी पाऊस नसल्याने गुऱ्हाळघरे लवकर चालू झाली आहेत. गुळाला मागील काही महिन्यांत २००० रु. टन असा भाव मिळत होता. यावेळी उसाला १४०० ते १५०० असा भाव प्रतिटन देत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना गुऱ्हाळमालक सरळसरळ लुटमार करताना दिसत आहेत.