गांजाचे आसाम ‘कनेक्शन’; अमली पदार्थ विक्रीप्रकरणी रत्नागितील २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By अरुण आडिवरेकर | Published: November 10, 2023 12:57 PM2023-11-10T12:57:27+5:302023-11-10T12:58:06+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी कडक माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव ...

Proposition of 25 people from Ratnagi in the case of drug sale | गांजाचे आसाम ‘कनेक्शन’; अमली पदार्थ विक्रीप्रकरणी रत्नागितील २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

गांजाचे आसाम ‘कनेक्शन’; अमली पदार्थ विक्रीप्रकरणी रत्नागितील २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी कडक माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत २५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तडीपारीची ही कार्यवाही झाल्यानंतर जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री थांबेल, असा विश्वास जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यात गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंत पाेलिसांनी आठजणांवर कारवाई केली. या कारवाईनंतर गुहागरात १ किलाे ३९० ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला हाेता, तर, रत्नागिरी शहरातील कर्ला परिसरात ४२ ग्रॅमचे ब्राऊन हेराॅइन जप्त करण्यात आले हाेते.

ही अमली पदार्थांची हाेणारी तस्करी आणि विक्री राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात धडक माेहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आसाम, सातारा, पंढरपूर या भागांतून गांजा हा अमली पदार्थ आणला जात आहे. तर, मुंबईसारख्या ब्राऊन हेराॅइन हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे तपास पुढे आले आहे. हा अमली पदार्थ काेणत्या मार्गाने जिल्ह्यात येत आहे, याचा शाेध घेतला जात आहे.

अमली पदार्थाची ही तस्करी व विक्री राेखण्यासाठी पाेलिसांनी काहींच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. यामध्ये २५ जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण हाेईल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

गांजाचे आसाम ‘कनेक्शन’

जिल्ह्यात आसाम भागातून माेठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. तेथील काही धागेदाेरेही हाती लागले आहेत. त्यादृष्टीने आता पाेलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच गांजा विक्रीच्या मुळापर्यंत पाेहाेचून जिल्ह्यातून अमली पदार्थ हद्दपार करणार असल्याचेही पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आसपासच्या काही जिल्ह्यांतूनही रत्नागिरीत गांजा येतो. त्याचीही बारकाईने माहिती घेतली जात आहे.

Web Title: Proposition of 25 people from Ratnagi in the case of drug sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.