शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प सरकारी कागदावरूनही पुसेन; उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:11 IST

'विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच'

रत्नागिरी : प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातील महिलांना या सरकारने मारहाण केली. त्याआधी जैतापूरमध्ये गोळीबारही झाला आहे. मात्र, आम्ही बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प होऊ देणार नाही. असे विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच; पण ते सरकारी कागदावरूनही पुसून टाकू, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत दिले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरगडी झाल्या आहेत, अशी टीका करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच प्रमुख लक्ष्य केले. प्रत्येक सभेत राम राम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे लोकांचा निरोप घेत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.कोकण हे शिवसेनेचे हृदय आहे; पण येथून धनुष्यबाण गायब केला गेला; पण खोक्यात बसलेल्या लोकांना कळलेच नाही की गद्दारांचे बाप शिवसेनेचे कोकणाशी असलेले नाते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. इकडचा खेळाडू तिकडे आणि तिकडचा खेळाडू इकडे. तशीच अवस्था आता राजकारणाची झाली आहे. त्यामुळे २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे जो आत्मविश्वास होता, तो आता दिसत नाही. आता ५६ इंचांच्या छातीमधील हवा गेली आहे, असा टोला त्यांनी हाणला.कांदा निर्यातीवरील बंदीबाबत बोलताना त्यांनी आता भाजपवरील निर्यातबंदी उठवून त्यांनाच बाहेर पाठवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले आणि ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. विनायक राऊत यांनी काजू निर्यातबंदीची समस्या मांडली. याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, कोकणातील अशा प्रश्नांकडे भाजपने कधीही लक्ष दिलेले नाही; कारण त्यांचा काेकणावर आकस आहे. आपण मुख्यमंत्री असताना कोरोना आणि दोन वादळे आली. या समस्या आल्या नसत्या तर आंबा, काजूबाबतच्या समस्याही आपण सोडवल्या असत्या.यावेळी व्यासपीठावर विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांच्यासह उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, तसेच ‘आप’चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार साळवी, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, राष्ट्रवादीचे सुरेश बने, उद्धवसेनेच्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बशीर मुर्तूझा, काँग्रेसचे अविनाश लाड, आमदार भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांचीही भाषणे झाली.

डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे म्हणून राज्यघटना बदलत आहेतभाजपचा महाराष्ट्रावर एवढा आकस आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, म्हणून राज्यघटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे