शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाविरोधात निषेध मोर्चा

By admin | Updated: November 9, 2015 23:31 IST

गुहागर नगरपंचायत : अन्य अतिक्रमणांवरही कारवाईचे आश्वासन

गुहागर : गुहागरमधील वरचापाट मोहल्ला येथील मदरशावर नगरपंचायतीने कारवाई केल्यानंतर आज येथील मुस्लीम बांधवांनी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढत नगरपंचायत कार्यालयासमोर तब्बल तीन तास ठिय्या मांडला व सरकार विरोधात घोषणाबाजी केली. नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या अन्य अतिक्रमणांवर पुढच्या २४ दिवसात कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.गुहागर शहरातील मुस्लीम मोहल्ल्यातील मदरसा तालीम - उल- कुर्रान ही जमातुल मुस्लिमीन, गुहागर या संस्थेची इमारत आहे. सात-बारावरील जागा आणि चालू असलेले बांधकाम यात तफावत असल्याची तक्रार माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी १३ जून २०१३ रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे केली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबरला मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी प्रांताधिकारी रवींद्र हजार,े उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे व विशेष पोलीस बंदोबस्तामध्ये या मदरशा इमारतीचा मागील वाढीव भाग तोडला होता. अशा प्रकारची कारवाई गुहागर शहरात पहिल्यांदाच झाली.जशी या मदरशावर कारवाई झाली, अशी अतिक्रमण असणाऱ्या अन्य बांधकामांवर कारवाई व्हावी असे निवेदन आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक, गुहागर यांना देण्यात आले.नगरपंचायतीवर मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व काळी फित लाऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी नगरपंचायतीच्या जनरल सभेमध्ये ठराव घेऊनही अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु, ज्या ठिकाणी धार्मिक शिक्षणाचे पवित्र कार्य केले जात आहे. त्या इमारतीला बळाचा वापर करुन नुकसान पोहोचवण्यासाठी दाखवलेली तत्परता केवळ अल्पसंख्यांक समाजाप्रती असलेली द्वेषभावना आहे, असा आमचा समज झाला असून, नगरपंचायतीने अन्य अतिक्रमण असलेल्या बांधकामांवर कारवाई करुन आमचा समज खोटा ठरवावा.सकाळी ११ वाजल्यापासून नगरपंचायतीसमोर घोषणाबाजी सुरु करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी इतर अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी जमातुल मुस्लिमीन संस्थेचे अध्यक्ष खलील माहीमकर, शब्बीर माहीमकर, गुलाम सय्यद, मदीना बालाभाई, नदीम सय्यद, मुबीरा माहीमकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दीपक कनगुटकर : पाठीशी असल्याचा दावाया मदरशाबाबत ६ नोव्हेंबरला न्यायालयात तारीख होती. ५ नोव्हेंबरलाच घाईने ही कारवाई करताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण पाडण्याचा तीन महिन्यांपूर्वी ठराव असूनही कारवाई झाली नाही. मात्र, येथील मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असते याचा राजकीय आकस मनात ठेवून ही कारवाई झाली आहे. आम्ही खंबीरपणे या मुस्लीम बांधवांच्या पाठीशी आहोत, असे नगरसेवक दीपक कनगुटकर यांनी सांगितले.बांधकामे तोडानगरपंचायतीने केलेली कारवाई ठराविक समाजाविरूद्ध केलेली नाही, हे सिद्ध करण्यासाठी अन्य अनधिकृत बांधकामेही तोडा, अशी मागणी करण्यात आली.