शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसमोर समस्या जटील

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

रात्रशाळा : मुलांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी

वाटूळ : राज्यात २१० रात्रशाळा असून, त्यामध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी मुंबईमध्ये सुमारे १३६ शाळा असून, त्यात १३ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दिवसाच्या शाळेतील मुलांच्या समस्या वेगळ्या, तर रात्रीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या खूप जटील असतात.रात्रशाळेत जाणाऱ्या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. शिक्षण नसल्याने दिवसभर श्रमाची कामे करून रात्रीच्या शाळेला जावे लागते. ती करून विद्यार्थी घरी न जाता परस्पर शाळेत जातात. दिवसभर काम करून थकल्यामुळे भूक लागते पण खाणार काय ? पगार कमी असल्याने घरच्या जबाबदारी पेलून खर्च कसा करायचा हा प्रश्न असतो. या परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करतात. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे म्हणाले.दिवसाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पोषण आहारासोबत पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविण्यात येतात. रात्रशाळेतील विद्यार्थी मात्र या सुविधांपासून वंचित आहेत. सरकारने या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून अशा सर्व इयत्तांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या सर्व मुलांना दिवसाच्या शाळांप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे. त्यांच्याकडे परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. राज्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)