संभाव्य तिसरी लाट नक्की राेखू : माेहितकुमार गर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:48+5:302021-06-21T04:21:48+5:30

चिपळूण : मालघर गावातील असलेला कोरोना प्रादुर्भाव आणि त्या संदर्भात ग्रामपंचायत करत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस ...

Probably the third wave is definitely Raekhu: Maehit Kumar Garg | संभाव्य तिसरी लाट नक्की राेखू : माेहितकुमार गर्ग

संभाव्य तिसरी लाट नक्की राेखू : माेहितकुमार गर्ग

Next

चिपळूण : मालघर गावातील असलेला कोरोना प्रादुर्भाव आणि त्या संदर्भात ग्रामपंचायत करत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रविवारी सायंकाळी ग्रामपंचायतीला भेट दिली. असंच काम सुरू राहिले तर संभाव्य येणारी तिसरी लाट आपण नक्की आपल्या गावाच्या बाहेर रोखू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मालघर गाव दत्तक घेतल्यानंतर ग्रामपंचायतीला दुसऱ्यांदा भेट देऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजना यांची संपूर्ण माहिती घेतली. नियोजन पद्धतीने सुरू असलेल्या उपाययोजना आणि त्याची संपूर्ण माहिती व्यवस्थित संकलित करून ठेवल्याबद्दल सरपंच आणि ग्रामसेविका यांचे अभिनंदन केले. कोरोनामुक्त गावासाठी काम करणाऱ्या सर्व कमिटी सदस्य, तसेच उपस्थित सरपंच सुनील वाजे, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील अजय वाजे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र पवार आणि सर्वेक्षण करणाऱ्या सदस्यांचे कौतुक केले.

Web Title: Probably the third wave is definitely Raekhu: Maehit Kumar Garg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.