रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 11:14 AM2021-12-01T11:14:14+5:302021-12-01T11:14:37+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

Presence of unseasonal rains at many places in Ratnagiri | रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

रत्नागिरीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदार धास्तावले

googlenewsNext

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. असे असतानाच आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

वातावरण बदलाचे  परिणाम वारंवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरात नोव्हेंबर महिन्यातील पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये २४.७ मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी 'यलो अ‌लर्ट' जारी केला आहे.

मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावासाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात ३ डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती.

Web Title: Presence of unseasonal rains at many places in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.