शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व 'जोर'धारेने जूनच्या पूर्वार्धातच रत्नागिरी जिल्ह्यातील ९ धरणे तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:30 IST

२३ धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा

रत्नागिरी : मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्यापाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ६७ धरणांपैकी ९ धरणे आताच १०० टक्के भरली असून, १४ धरणांमध्ये ७५ टक्के तर १३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होत असल्याने पाऊस लांबला तर पुन्हा धरणांच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मे महिन्यातील पावसाने गेल्या २० वर्षांतील पहिलाच उच्चांक केला आहे. या मे महिन्यात सर्वाधिक १३ दिवस संगमेश्वरमध्ये पाऊस पडला. त्यामुळे मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होण्यास मदत झाली.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६८ धरणे आहेत. त्यापैकी नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. तर उर्वरित ६५ लघु प्रकल्प आहेत. यापैकी २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण कोसळल्याने यात पाणीसाठा होत नाही. तसेच राजवाडी आणि काेंडवाडी या दोन नादुरुस्त धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. तर सात धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी साठा ठेवला जातो.मे महिन्याच्या उत्तरार्धात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आटलेल्या धरणांमध्येही पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. मे महिन्याच्या २९ तारखेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६८ धरणांपैकी ३६ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

नद्यांच्या पाणी पातळीतही झाली वाढरत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या जगबुडी, वाशिष्ठी, स्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी अशा आठ नद्या आहेत. उन्हाळ्यात या नद्यांची पात्रे कोरडी होऊ लागली होती. मात्र, ते महिन्यात पडलेल्या पावसामुळे या नद्यांची पात्रेही भरलेली आहेत. पाऊस लांबल्यास धरणाप्रमाणे नद्यांच्या पात्रातही घट होण्याची शक्यता आहे.