शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

भातगाव कोसबी शाळेच्या ह्यरिंग द बेल फॉर वॉटर उपक्रमाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:17 IST

दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटरह्ण या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.

ठळक मुद्देपहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.

रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी घंटा अथवा बेल वाजविली जाते. मात्र, नियमित शाळा भरण्याच्या, सुटण्याच्या वेळा, जेवणाची सुटी, व दोन सत्रातील दोन छोट्या सुट्यांसाठी बेल वाजवित असताना आता नवीन बेल सुरू करण्यात आली आहे. ही बेल वाजताच विद्यार्थी आपापल्या पाण्याच्या बाटल्या काढून त्यातील पाणी पित आहेत. भातगाव-कोसबी शाळेमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटरह्ण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ह्यरिंग द बेल फॉर वॉटर या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.दिवसात किमान दोन ते तीन लीटर पाणी शरीराला आवश्यक आहे. मात्र, मुले एवढे पाणी पित नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन कोसबी शाळेच्या शिक्षकांनी पाणी पिण्यासाठी बेल वाजविण्याचा निर्णय घेतला, शिवाय अंमलबजावणीही सुरू केली आहे. पाणी पिण्यासाठी बेल देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती, त्यानंतर दिवसातून ठराविक वेळी बेल वाजविली जाते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी जेवढी तहान असेल तेवढे पाणी पितात. पहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.आरोग्य विज्ञानानुसार पाणी नियमितपणे प्यायल्याने मूत्रावाटे क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी असते. आपल्या शरीरात ६0 टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील विषारी पदार्थांचे विसर्जन या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा उपक्रम मुख्याध्यापक संतोष रावणंग व सहकारी शिक्षक शाळेमध्ये राबवित असून, या उपक्रमाचे ग्रामस्थांकडूनही विशेष कौतुक होत आहे.चळवळ व्हावीबदलत्या तापमानामुळे उष्मा आता तीव्रपणे जाणवू लागला आहे. अशा दिवसात कमी पाण्यामुळे मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर ह्यपाण्यासाठी घंटाह्ण अशा माध्यमातून शाळांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ह्यपाण्यासाठी घंटाह्ण हा केवळ उपक्रम न राहता एक चळवळ म्हणून सर्वत्र पसरण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाWaterपाणी