शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाच्या छताच्या गळतीस प्लास्टिकचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

मंडणगड : मोसमी पावसाच्या सुरुवातीला मंडणगड बसस्थानक इमारतीच्या छतास लागलेली गळती व त्यामुळे झालेली प्रवाशांची गैरसोय यावर झालेल्या ...

मंडणगड : मोसमी पावसाच्या सुरुवातीला मंडणगड बसस्थानक इमारतीच्या छतास लागलेली गळती व त्यामुळे झालेली प्रवाशांची गैरसोय यावर झालेल्या सार्वत्रिक चर्चेनंतर आगार व्यवस्थापनास नुकतीच जाग आली आहे. गळती लागलेल्या भागात प्लास्टिक कापड टाकून गळती थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तालुक्यातील स्थानिक मुद्रित माध्यमांनी बसस्थानक परिसराची दुरवस्था हा विषय उचलून धरला. या समस्येसंदर्भातील प्रवाशांच्या मनातील खदखद लक्षात घेत आगार व्यवस्थापनाने भर पावसात छतावर माणसे चढवून प्लास्टिक टाकले. अजूनही मोसमी पावसाचे तीन महिने बाकी असल्याने आगारव्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या उपाययोजना टिकतील की नाहीत, याविषयी शंका आहे. गतवर्षी २ जून २०२० रोजी शहरात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात बसस्थानकाच्या छपराची नासधुस झाली. यास एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. एक वर्षात गळतीवर समस्या शोधण्यासाठी पुरेसा कालावधी असतानाही आगार व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. आगाराची मुख्य इमारतही याच समस्येने ग्रस्त आहे. आगार व्यवस्थापनाच्या या अजब कारभाराबद्दल तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आहे.