कुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:46 PM2021-02-03T12:46:11+5:302021-02-03T12:47:50+5:30

bridge Konkan Ratnagiri- देवरुख तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.

The pillar of the pottery bridge is worn out, the bridge is dangerous | कुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायक

कुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायक

Next
ठळक मुद्देकुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायकसर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणी

देवरुख : तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.

५० च्या दशकातील या पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हे काम कडवई येथील ठेकेदारामार्फत केले जात आहे. मागील एक महिन्यापासून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येत होती. मात्र, मंगळवारी (दि. २) सकाळी येडगेवाडी -चिपळूण व येडगेवाडी-माखजन या वस्तीच्या दोन बस या पुलावरून गेल्यानंतर पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळल्याचे दिसून आले.

सध्या या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली असून, तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक वळविण्यात आली आहे. सकाळी ही घटना निदर्शनास येताच कुंभारखाणीचे पोलीस पाटील यांनी तहसीलदार सुहास थोरात व संगमेश्वर पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदयकुमार झावरे यांना ही माहिती दिली. तहसीलदार यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी तातडीने तलाठी यांना घटनास्थळी रवाना केले. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी संगमेश्वर पोलीस स्थानकाचे कडवई बीट अंमलदार राजेंद्र जाधव व स्वप्निल जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले.

पूल ढासळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख उपविभागीय अभियंता पूजा इंगवले व शाखा अभियंता प्रमोद भारती यांनी ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. या पुलाची दुरुस्तीऐवजी नव्या पुलाची मागणी स्थानिकांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता विकास देसाई, अक्षय बोरसे, ईश्वर बामणे, दिलीप सुर्वे, राकेश सुर्वे, विनायक सुर्वे, सुनील सुर्वे, सिध्दांत येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व पूल तपासा

आरवली ते राजिवली येडगेवाडी या मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणीही केली. त्यानुसार उपविभागीय अभियंता इंगवले, प्रमोद भारती यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभारखाणी ते कुचांबे दरम्यानच्या पुलांची पाहणी केली. आवश्यक असलेल्या मोऱ्या पावसाळ्यापूर्वी बांधून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली.

Web Title: The pillar of the pottery bridge is worn out, the bridge is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.