देवरुख: संगमेश्वर-बडदवाडी एसटी बसमध्ये साप आढळल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ झाला. बस सुरु होताच चालकाच्या शेजारी बसलेल्या मुलीला हा साप (Snake) दिसताच ती ओरडायला लागली. चालक, वाहक आणि धाडसी प्रवाशांनी त्या सापाला एसटी बसमधून बाहेर काढले. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.संमेश्वरातुन सुटलेली एसटी बस काही अंतर पुढे येताच गाडीत साप आढळला. यामुळे प्रवाशी गाडी थांबवा असे ओरडू लागले. हा साप बेलच्या दोरीला विळखा बसला होता. साप एसटीच्या दरवाज्यासमोर पुढे येताच एका धाडसी प्रवाशाने बेलच्या दोरीवरुन त्या सापाला काठीच्या सहाय्याने अलगद बाजुला रस्त्यावर उडविले अन् प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
English
हिंदी सारांश
Web Title : Snake in Ratnagiri ST Bus Sparks Panic Among Passengers
Web Summary : Passengers panicked when a snake was spotted in a Ratnagiri ST bus. A brave passenger safely removed the snake with a stick, relieving everyone. The incident occurred Monday morning.
Web Summary : Passengers panicked when a snake was spotted in a Ratnagiri ST bus. A brave passenger safely removed the snake with a stick, relieving everyone. The incident occurred Monday morning.
Web Title : रत्नागिरी: एसटी बस में सांप दिखने से यात्रियों में मची अफरा-तफरी
Web Summary : रत्नागिरी एसटी बस में सांप दिखने से यात्रियों में दहशत फैल गई। एक साहसी यात्री ने लाठी से सांप को सुरक्षित रूप से हटाया, जिससे सभी ने राहत की सांस ली। घटना सोमवार सुबह की है।
Web Summary : रत्नागिरी एसटी बस में सांप दिखने से यात्रियों में दहशत फैल गई। एक साहसी यात्री ने लाठी से सांप को सुरक्षित रूप से हटाया, जिससे सभी ने राहत की सांस ली। घटना सोमवार सुबह की है।