शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: फत्तेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला, चार घरांचे नुकसान; पुनर्वसनाचे भीजत घोंगडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:08 IST

प्रशासनाकडून एकूण २२ कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश

दापोली : तालुक्यातील हर्णे फत्तेगड परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दरड काेसळली. या दरडीमुळे दोन घरांना थेट धोका निर्माण झाला असून, मारुती कृष्णा पेडेकर आणि वामन शशिकांत रघुवीर यांच्या घरांसह एकूण चार घरांचे नुकसान झाले आहे.दापोली तहसीलदार अर्चना घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या कुटुंबीयांना धीर देत त्वरित स्थलांतर होण्याचा सल्ला दिला. प्रशासनाकडून एकूण २२ कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गडाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडांचे अवशेष आले असून, घरांच्या भिंतीही काही प्रमाणात धोकादायक बनल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून संबंधित कुटुंबांना तातडीने स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.फत्तेगड परिसरातील कुटुंबांच्या पुनर्वसनाचे भीजत घोंगडेफत्तेगड परिसरात सध्या सुमारे ७० ते ८० कुटुंबे वास्तव्यास आहेत. हा परिसर भूस्खलनासाठी अतिशय संवेदनशील असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत दरवर्षी पावसाळ्यात गडाच्या विविध भागांमध्ये भेगा पडणे, दरडी कोसळणे आणि जमिनी खचणे यांच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे रहिवाशांना कायमस्वरूपी धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाने वेळोवेळी त्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.किल्ल्यासह ग्रामस्थांची सुरक्षाफत्तेगड हा ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. त्याच्या संरक्षणासह येथे राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचाही विचार सरकारने करणे आवश्यक आहे. जोपर्यंत या कुटुंबांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत दरवर्षी अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.